Logo माझी वसुंधरा अभियान

ग्रामपंचायत लहित खुर्द

तालुका : अकोले जिल्हा : अहिल्यानगर स्थापना : १ मे १९६२
स्वच्छ सुंदर हरित गाव !
Symbol लेक वाचवा ! देश वाचवा !
सूचना
📢 मिळालेले पुरस्कार :- *निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त* *तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त* *हागणदारी मुक्त गाव ODF अधिक* 🧾 विद्यमान बोर्ड कार्यकाल २९/१२/२०२२ ते २८/१२/२०२७ 🧾 श्रीमती अनिता किशोर गोडसे आदर्श सरपंच पुरस्कार २०२४/२५ 🧾 श्री. महेश रेवणनाथ शेळके आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार सन २०२१/२२

लहित खुर्द गाव सर्वसाधारण माहिती

अकोले तालुक्यातील लहित खुर्द हे गाव सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुंदर गाव आहे. गावाच्या उत्तरेकडून मुळा नदी वाहत असून गावाची लोकसंख्या १७२५ व कुटुंबसंख्या ३७० आहे. ग्रामपंचायत मध्ये एकूण १० सदस्य असून सरपंच निवड ही थेट जनतेतून करण्यात आलेली आहे. लहित खुर्द गावाचे ग्रामपंचायत अधिकारी श्री.महेश रेवणनाथ शेळके व सरपंच सौ. अनिता किशोर गोडसे ह्या आहेत.

गावामध्ये अतिप्राचीन संगमेश्वर मंदिर असून दरवर्षी गावामध्ये यात्रा भरते.त्यामध्ये भव्य कुस्ती स्पर्धा,बैलगाडा शर्यत अशी पारंपारिक कार्यक्रम घेतले जातात. गावात लोकसहभागातून व सप्रेम संस्था, कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने बिहार पॅटर्न अंतर्गत १५०० केशर आंबा वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. तसेच ५०० रस्ता दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे. गावामध्ये बंदिस्त गटार असून गावास ३७० कुटुंबास शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा जल जीवन मिशन योजना अंतर्गत पूर्ण योजनेतून होत आहे, ही योजना पूर्णतः सोलर वर आधारित आहे. गावासाठी आरो प्लांट असून तेथे शुद्ध व थंड पाणी माफक दरामध्ये ग्रामस्थांना एटीएम द्वारे उपलब्ध करून दिले जाते. गावामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करण्यात आलेले असून ओला सुका कचरा विलीगीकरनासाठी कचरा पेटी ठेवण्यात आली आहे.

गावामध्ये १ ली ते ७ वी पर्यंत जि.प.प्रा. शाळेमध्ये शैक्षणिक सुविधा उपलब्ध असून शाळेतील सर्व डिजिटल केले असून सुसज्य इमारत व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच सुसज्य इमारत असून अंगणवाडी डिजिटल आहे.

गावास लिंगदेव आरोग्य उपकेंद्रमार्फत गावामध्ये आरोग्याच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. गावातील सर्व रस्ते विविध योजनेअंतर्गत पूर्ण केले असून गावठाण व वाडीवस्तीवर दिवाबत्ती सुविधा करण्यात आली आहे. तसेच वैकुंठधाम स्मशानभूमी गावामध्ये नदीकाठी असून सर्व जाती धर्माच्या ग्रामस्थासाठी एक संयुक्त सुसज्य स्मशानभूमी आहे.

गावास यापूर्वी तंटामुक्त गाव संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त झाले असून गाव माझी वसुंदरा अभियान ६.० व मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सहभाग घेत असून आदर्श गावाकडे वाटचाल करीत आहे.

मुख्य पदाधिकारी

सरपंच
सरपंच
सौ. अनिता किशोर गोडसे
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत अधिकारी
श्री. महेश रेवणनाथ शेळके

गावची मुख्य माहिती

  • एकूण लोकसंख्या : १७२५
  • एकूण कुटुंब संख्या : ३७०
  • गावचे क्षेत्रफळ : ७३२.३५ हे.

आमच्याशी जोडा

माहिती – PDF